महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी संघटनात्मक फेररचना करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यासह भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले.‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय फेररचना करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षकांचे अहवाल, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर या नियुक्त्यांना अंतिम मंजुरी देण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत अध्यक्षांची घोषणा केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील नियुक्त्यांमध्ये ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी राहुल करबारी पिंगळे, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी चेतनसिंह एच. पवार, भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी आबिद खान मुन्सफ, कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नवीन सिंग, डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अमित भास्कर म्हात्रे, मीरा-भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी राकेश राजपुरोहित, नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी रामचंद्र धर्माजी दळीवी तर उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी रोहित चंद्रकांत साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.