
ठाणे, प्रतिनिधी .
ठाण्यातील दमानी इस्टेट परिसरातील ऐतिहासिक दत्त मंदिरात आज दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.
1912 साली विठ्ठल सायन यांनी हे मंदिर उभारले असून 113 वर्षांच्या परंपरेला साजेशा वातावरणात यंदाही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची रसोई सुरू झाली होती. दत्तांच्या दर्शनासाठी रांगा लागत राहिल्या. मंदिरात विशेष पूजन, महाआरती, भक्तीसंगीत आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरात दिवे, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
दत्त जयंतीनिमित्त येथील मंदिरात दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदाही ही परंपरा कायम राहिली. परिसरातील नागरिकांसह विविध भागांतून भक्त दर्शनासाठी दाखल झाले. मंदिर समिती आणि स्वयंसेवकांनी दर्शनाची सुयोग्य व्यवस्था ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडला.
दत्त भक्तीची परंपरा जपणारे हे ठाण्यातील एक जुने आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर असून, दत्त जयंती हा येथील प्रमुख धार्मिक उत्सव मानला जातो.
1912 साली विठ्ठल सायन यांनी या मंदिराची स्थापना केली होती तेव्हापासून या मंदिरात अविरत भक्तीभावाने सेवा येथील भाविक करत असतात.