filter: 109; fileterIntensity: 0.8; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.43120387, 0.40145832);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;
ठाणे शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील शेकडो प्रौढ झाडांवर तोडण्याचे संकट पुन्हा एकदा घोंघावत असून, या गंभीर धोक्याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीचे निवेदन सादर केले आहे. ठाण्यातील उरलेल्या मोजक्या हिरव्या पट्ट्यांपैकी हा परिसर सर्वात महत्त्वाचा असल्याने या झाडतोडीला ठाणेकरांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत – 1. झाडतोडीचा प्रस्ताव स्वतंत्र, पारदर्शक आणि तज्ज्ञ समितीकडून पुनर्विचारावा. 2. स्थलांतर शक्य असलेल्या झाडांना वैज्ञानिक पद्धतीने त्वरित वाचवावे. 3. नवे बांधकाम आराखडे झाडांना कमीत कमी हानी पोहोचेल असे बदलावे. 4. तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाची माहितीसह संपूर्ण प्रक्रिया नागरिकांसाठी खुले करावी. “ही झाडे फक्त हिरवळ नाहीत, ही ठाण्याचा श्वास, ठाण्याची ओळख आहेत. विकास हवा; पण विनाशाच्या किंमतीवर नव्हे.” आता मुख्यमंत्री या निवेदनाची दखल घेतात का, आणि शेकडो झाडांचे भवितव्य काय ठरेल याकडे संपूर्ण ठाण्याचे लक्ष लागले आहे.
बंगलोर येथील NIMHANS धर्तीवर नवे आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याचा प्रकल्प स्वागतार्ह असला, तरी त्यासाठी शेकडो झाडांवर कुर्हाड चालणार असल्याची माहिती नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण करत आहे. शहराने यापूर्वी अनेकदा “कागदावर दहा… प्रत्यक्षात तीस” अशी झाडतोड अनुभवली असल्याने नागरिकांचा अविश्वास वाढलेला आहे. डॉ. सिनकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की या परिसरातील उंच, प्रौढ, दशकानुदशके उभ्या असलेल्या झाडांमुळेच ठाण्याचे तापमान नियंत्रित राहते, जैवविविधता टिकते आणि शहराला नैसर्गिक श्वास मिळतो. मोठ्या प्रमाणात झाडांची तोड झाली, तर पर्यावरणीय संतुलन ढासळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे