ठाणे (22) : मन:शक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्यावतीने ठाणे महानगरपालिका शाळा, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील इयत्ता 9 वी 10 वी तील विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी 25 डिसेंबर 2025 रोजी ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर विनामूल्य मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 19, विष्णुनगर, ठाणे येथे सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2 व दुपारी 3 ते 5 या तीन सत्रांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. इयत्ता 9 वी 10 वी च्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेस सामोरे जाताना’ विद्यार्थी व पालकांवर येणारा परीक्षेचा ताण, अपुरा वेळ, मार्काचे टेन्शन, अपेक्षांचे ओझे, लोक काय म्हणतील या विचाराने विद्यार्थी व पालकांना नैराश्य येते. या सर्व समस्यांमधून बाहेर कसे पडावे यासाठी हे विनामूल्य मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
सदर शिबिराकरिता नोंदणी करणेसाठीची लिंक https://forms.gle/kMnjADmh6i4hk8AA6 व क्यू आर कोड देण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक यांनी मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे उपआयुक्त सचिन सांगळे यांनी केले आहे.