या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे शहराशी असलेलं आपलं नातं भावनिक शब्दांत मांडलं. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झालेल्या विकासकामांची यादी त्यांनी सभागृहात वाचून दाखवली. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेने ठाण्याच्या विकासासाठी दिलेलं योगदान त्यांनी अधोरेखित केलं.
“ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. त्यामुळे ठाणेकरांचा ऋणानुबंध मी आयुष्यभर जपेन”, असं भावनिक वक्तव्य त्यांनी या मेळाव्यात केलं.
मेळाव्यादरम्यान विविध पक्षांतील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश देखील झाला. यावेळी उबाठा गटातील नवी मुंबईचे नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी आणि तेजश्री मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर नवी मुंबई काँग्रेसचे नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील तसेच काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पुनम मिथुन पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
या मेळाव्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे, शिंदे साहेबांचं योग्य नेतृत्व, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास या जोरावर ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे.
यावेळी माझ्यासह शिवसेनेचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक, उपनेते रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, सचिव राम रेपाळे, उपनेते विजय चौगुले, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.