filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 49;
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप महायुतीचे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हे सर्व उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एकाच वेळी सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ही ठाण्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ११०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत एकूण ९९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. तर, १ जानेवारीला एकूण २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. यामुळे ८९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून यामुळे वागळे इस्टेट तसेच वर्तकनगर भागात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमदेवार बिनविरोध निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात हे उमदेवार बिनविरोध निवडून आले आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडुक करण्याचे प्रयत्न झाले पण, त्यात शिंदेच्या सेनेला यश आले नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट पट्टयातील प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे विजयी झाले आहेत. तर, या पॅनलमधील उमेदवार निलेश लोहाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेला त्यात यश आले नाही. या प्रभागातील उमेदवार दिपक वेतकर हे बिनविरोध होऊ शकले नाही.
सावरकरनगरमधील प्रभाग क्रमांक १४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर, मनसेच्या उमेदवार रेश्मा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. यामुळे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवार शीतल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या. किसननगर येथील प्रभाग क्रमांक १७ मधून एकता भोईर तर, वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसेना (शिंदे गट) जयश्री डेव्हीड आणि सुलेखा चव्हाण या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या आहेत.