महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील असंख्य काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहेराष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे सचिव गणेश वैती तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता माने यांनी त्यांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून यामध्ये महाराष्ट्र प्रदेश तंत्रविज्ञान अध्यक्ष जय नारायण गुप्ता त्याचप्रमाणे राजेश कदम प्रभाग क्रमांक 13 चे अध्यक्ष राजस्थान विभाग अध्यक्ष महेश कुमावत उपाध्यक्ष अजय गायकवाड प्रभाग क्रमांक 19 चे अध्यक्ष दादाभाई इस्माईल वार्ड क्रमांक 13 चे सचिव हरिकेश यादव ठाणे जिल्हा निषाद समाजाचे अध्यक्ष रामप्रकाश निषाद तसेच या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 व विविध प्रभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज आपल्या काँग्रेस सदस्यता राजीनामा व सर्व पदांचा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला..