ठाणे महानगरपालिका निवडणुकीत #शिवसेना #भाजपा #रिपब्लिकन_सेना महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या सर्वांचे अभिनंदन करून भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम रेपाळे यांचा समावेश होता. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मला सन्मानित करण्यात आले. या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी आता इतर प्रभागातील शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, शिवसेना उमेदवार दीपक वेतकर, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.