filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 54;
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले असून या घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. सोमवारी अजित पवार यांचा अस्थी कलश ठाणे पक्ष कार्यालयात आणण्यात आला. हा कलश पाहून माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूक प्रचारसाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी बारामतीला विमानाने निघाले. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच, विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघात झाला. या अजित पवार, विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचा मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वाचा एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने कार्यकर्ते तसेच समर्थकांमध्ये मोठे दुःख व्यक्त केले जात असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे.