नाशिक प्रतिनिधी:- मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी याच मुद्द्याला हाताशी धरून राज्यातील सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले. मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. व्हायरल व्हिडीओची तातडीने चौकशी व्हावी आणि कारवाईदेखील करावी, असेही ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? शासकीय निवास्थानात एखादा मंत्री असे कृत्य करीत असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तृथीयपंथी पवन यादव याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे अनेक मंत्र्यांबरोबर फोटोही असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातच घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टीची मागणी केली आहे. यादरम्यान महायुतीतील मंत्र्याची ही अश्लील चित्रफित कुणी आणि कशी रेकॉर्ड केली, याबाबतची खळबळजनक माहिती समोर आली आहे