राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. तसेच राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. याच सगळ्या घडामोडी पाहता नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं.”आज आपल्या अवतीभोवती जे सामाजिक आणि राजकीय घडत आहे, ते पाहून कधीकधी घुसमट होत असल्याचं जाणवतं. तुम्ही भूमिकेच्या माध्यमातून तुम्ही त्यावर टिप्पणी करु शकता, त्यावर भाष्य करु शकता”, असं नाना पाटेकर म्हणाले.