“विकास” या नावाखाली भविष्यातील परिणामांचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर झाडतोड केली जात असल्याचे आपण वारंवार पाहिले आहे. अशीच बेजबाबदार झाडतोड यापूर्वी आरे जंगलात देखील करण्यात आली होती आणि त्याचे दुष्परिणाम आज स्पष्टपणे दिसत आहेत.मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे पर्यावरण अध्यक्ष जय श्रींगारपुरे यांच्या पुढाकाराने ठाणे मानसिक रुग्णालय परिसरातील एकूण झाडांचा सविस्तर सर्वेक्षण करण्यात येत आहे..
मुंबई व ठाण्यासारख्या शहरांमध्ये हवेचे प्रदूषण आधीच धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत निष्काळजीपणे झाडांची कत्तल करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करण्यासारखे आहे.
या सर्वेक्षणाअंतर्गत मनसे कार्यकर्ते प्रत्येक झाडाला मनसेचा मफलर बांधून, जिओ-लोकेशन टॅगसह फोटो काढत आहेत, जेणेकरून भविष्यात एकही झाड तोडले जाणार नाही याची ठोस नोंद राहील