लातूरचे माजी महापौर आणि काँग्रेसचे सक्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विक्रांत गोजमगुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गोजमगुंडे यांनी पक्षप्रवेश केला. गोजमगुंडे यांनी २०१९ ते २०२२ या कार्यकाळात लातूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले आहे.