filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 47;
ठाणे शहरातील जैन ट्रस्टच्या महावीर जैन हॉस्पिटल व प्रताप आशर कॉर्डियाक सेंटर, हाजुरी येथे ३८ वर्षीय महिलेचे संपुर्ण अवयव दान करण्यात आले आहेत. ही महिला ठाणे येथे राहणारी होती. या महिलेचे मरणोत्तर अवयवदान करण्यास नातेवाईकांनी परवानगी दिल्यामुळे सहा रुग्णांना जीवनदान मिळाले.
ठाण्यातील ३८ वर्षीय महिलेच्या अवयव दानामुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे. ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच संपूर्ण अवयव दानाची घटना असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षापासून अवयव दानाविषयी होत असलेल्या जनजागृतीला नागरिक प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे.
महिला १९ डिसेंबर रोजी मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल झाली होती. याच कालावधीत तिचा रक्तदाबही प्रचंड वाढला होता. उपचार सुरू असतानाच २२ डिसेंबर रोजी तिचा मेंदू निकामी झाला, तर २५ डिसेंबर रोजी वैद्यकीय तपासणीनंतर तिला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांशी संवाद साधून अवयवदानाची माहिती दिली.
डॉ. विनीत रणवीर यांनी सांगितले, मेंदूमृत घोषित झाल्यानंतर ऑर्गन डेथ व्हायला सुरुवात होते. योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो. तसेच अवयवदानाबाबत समाजात अधिक जनजागृती होण्याची गरज असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. या महिलेच्या पाश्चात्त्य नऊ वर्षांची मुलगी आहे. तिच्या भविष्यासाठी जैन ट्रस्टच्यावतीने एक लाख रुपये आणि महावीर जैन हॉस्पिटलच्यावतीने एक लाख रुपये, असे एकूण दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याशिवाय, ती अठरा वर्षांची होईपर्यंत तिच्या शिक्षण व आवश्यक गरजांसाठी मदत केली जाणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.
नातेवाईकांच्या संमतीने संपूर्ण अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. यात या महिलेचे हृदय, फुफ्फुसे, दोन मूत्रपिंड, यकृत आणि स्वादुपिंड (पॅन्क्रिया) असे सहा महत्त्वाचे अवयव २६ डिसेंबर रोजी दान करण्यात आले. यामुळे सहा रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. ठाणे जिल्ह्यातील ही संपूर्ण अवयवदानाची पहिलीच घटना असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दान केलेले काही अवयव मुंबईतील रुग्णांना देण्यात आले. विशेष म्हणजे, ठाण्याहून मुंबईतील पवई येथे अवघ्या १७ मिनिटांत हृदय पोहोचवण्यात यश आले, ही प्रक्रिया ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पार पडली