ठाणे प्रतिनिधी
कासरवडवाली पोलीस ठाणे हद्दीतील ओवळा येथील ब्लू रूफ क्लब येथे आज लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री सुमारे २२:४० वाजण्याच्या सुमारास पार्किंगलगत असलेल्या मोकळ्या जागेत मंडप डेकोरेशन स्टोअरजवळ जुने कार्पेट व इतर साहित्य ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी फटाक्यांमुळे अचानक आग लागली.
या आगीत मंडप डेकोरेशनचे साहित्य, कार्पेट तसेच इतर सामानाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुढील तपास कासरवडवाली पोलीस करत आहेत.