filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 43;
आनंद आश्रमात अर्ज घेण्यासाठी आजी माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. त्यात गेले अनेक वर्षे उमेदवारी मिळविण्यासाठी अर्ज करूनही अद्याप उमेदवारीपासून वंचित असलेले काही पदाधिकारी दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत तरी उमेदवारी मिळेल या आशेने ते अर्ज घेण्यासाठी आले होते. तर, माजी नगरसेवकही उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आले होते. प्रभागातील विद्यमान नगरसेवकाऐवजी आम्हाला उमेदवारी द्यावी, यासाठी प्रभागातील काही इच्छूक अर्ज घेण्यासाठी गर्दी करताना दिसून आले. या रांगेत मागील तीन ते चार टर्म नगरसेवक अर्ज घेण्यासाठी उभे होते. तर अनेक नवीन चेहरे, जेष्ठांसह महिलांची संख्या ही अधिकची दिसून आली.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यासह त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू केला असतानाच, बुधवार दुपारपासून शिवसेना (शिंदे गट) पक्षाने इच्छूक उमेदवारांना अर्ज देण्यास सुरूवात केली. हे अर्ज घेण्यासाठी माजी नगरसेवकांसह नवइच्छूक पदाधिकाऱ्यांनी आनंदाश्रम येथे मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांनी काही दिवसांपुर्वी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मात्र ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, मंगळवारी ठाण्यात झालेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी इच्छूक उमेदवारांना बुधवार दुपारपासून आनंदाश्रमात अर्ज वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर बुधवार दुपारपासून आनंदाश्रमात इच्छूकांनी मोठी गर्दी केली होती.