ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवाराचा एआय तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर.
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी ह्या बदलत असतात सध्या आर्टिफिशल इंटेलिजंट चे युग आलं असून याचा पुरेपूर वापर सर्व क्षेत्रात होताना पाहायला मिळते. यंदाच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतही आर्टिफिशल इंटेलिजंट तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पाहायला मिळाले, यंदा नवीन चेहरे तसेच तरुणाइ मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीचे निवडणूक प्रचार म्हणजेच ढोल ताशा वाजवणे बॅनर पोस्टर धरून दारोदारी मतांचा जोगवा मागत असताना तर दुसरीकडे तरुणाई आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळते,पूर्वी निवडणुकीचे पोस्टर बॅनर व्हिडिओ बनवण्याकरिता तासनतास वेळ वाया जात असे, व ते नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता खर्चही मोठ्या प्रमाणात व्हायचा, मात्र AI च्या मदतीने आता क्षणात पोस्टर तसेच आपल्याला हवे त्या प्रकारचे व्हिडिओ सुंदर अशा व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये क्षणात तयार झालेले पाहायला मिळते.
तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे असलेल्या प्रभागात तो संपूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचविता येतो या संपूर्ण
तंत्रज्ञानाचा वापर करत ठाण्यातील प्रभाग क्रमांक आठ मधील काँग्रेसचे तरुण उमेदवार स्वप्निल भोईर यांच्या वतीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे . यावरून AI तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या निवडणूक प्रचारात होत असल्याचे दिसून येते.
एकीकडे पारंपारिक निवडणूक प्रचार व दुसरीकडे नव नेतृत्व नव्या तंत्रज्ञानाचा करत असलेला वापर यामुळे मतदारांना आकर्षित करण्याकरिता कोण बाजी मारणार हे येत्या 15 जानेवारीला मतदानाच्या स्वरूपात दिसून येणार आहे.
अधिक बातमीसाठी पाहत रहा ठाणे न्यूज 9