आम आदमी पार्टी ठाणे महापालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवणार : ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष अमर आमटे
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्ष स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याचे आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष अमर आमटे
यांनी स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्ष येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार आहे. तर दिल्ली आणि पंजाब सरकारप्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य, चांगले रस्ते अशा मूलभूत मुद्द्यांवर येथील निवडणूक आम्ही लढवणार असल्याचे आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष अमर आमटे
यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. आम आदमी पार्टी यांच्यातर्फे ठाणे महापालिका हद्दीत विविध विषयावर आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढण्यात, झोपडपट्टी पुनरविकास प्राधिकरण मार्फत होणारे घोळ, जनते समोर आणले असून दरवेळी सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे आम आदमी ठामपणे राहिली असून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम देखील आम आदमी पार्टीने केले असल्याचे अमर आमटे यांनी सांगितले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत असलेली आम आदमी पार्टी ठाणे महापालिकेत मात्र स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने महाविकास आघाडीला फटका बसणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पार्टी अध्यक्ष अरविंद केजरीवाल स्वतः व पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मानसिंग, राज्यसभा सदस्य संजय सिंग, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, माजी मुख्यमंत्री दिल्ली आतिशी मार्लेना, आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार सौरभ भारद्वाज आदी तगड्या नेत्यांची फळी प्रचारासाठी उपस्थित राहणार असून ठाणे महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार असल्याचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष अमर आमटे
यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्ली पंजाब प्रमाणे ठाण्यामधेही थाणे करांना सर्व सुविधा दिल्या जातील, त्याच नुसार जाहीरनामा सुद्धा लवकर प्रसारित करणार असल्याचे ह्यावेळी ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष अमर आमटे
ह्यानी प्रचार माध्यमाशी बोलताना सांगितले तथा स्वच्छ राजकारना साठी ठाण्याच्या विकासाठी उच्च शिक्षित,तथा सामाजिक सेवकांनी आदमी पक्षाच्या खांद्याला खान्दा लावून आम आदमी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे आवाहन ही ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष श्री अमर आमटे ह्यांनी केले.