filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 48;
घोडबंदर मार्गावरील माजिवाडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ, कासारवडवली असे उड्डाणपुल आहेत. यातील कासारवडवली उड्डाण पुल काही महिन्यांपुर्वीच वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असून हा पुल वगळता इतर माजिवाडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ पुलांवरील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मास्टीक पद्धतीने हे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते उंच सखल झाले आहे. काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. तसेच या मार्गावर मास्टिकचे मोठे फुगवटे तयार झाले होते.
घोडबंदर मार्गावरून उरणच्या जेएनपीटी बंदर ते गुजरात अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. दुपार आणि रात्रीच्या वेळेत ही वाहतूक सुरू असते. याशिवाय, स्थानिक नागरिकांची वाहनेही याच मार्गावरून वाहतूक करतात. ही वाहतूक सकाळ आणि सायंकाळी सुरू असते. यामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या मार्गावर मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी अशी कामे सुरू आहेत. दरवर्षी या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि यामुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंद करण्यात येत आहे. या रुंदीकरण कामादरम्यान, रस्ते काँक्रीटचे करण्यात येत आहेत. नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून रस्ते काँक्रीटचे करण्यात येत आहे. असे असले तरी, याच मार्गावरील उड्डाण पुलावरील डांबरी रस्त्यांची मात्र दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे