मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. ही सदिच्छा भेट आहे की आणखी काही? या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली होती. दरम्यान या युतीला मुंबईत यश मिळू शकलं नाही. जानेवारी महिन्यात जे निकाल समोर आले त्यात मनसे हा सर्वात कमकुवत कामगिरी करणारा पक्ष राज्यभरात ठरला. या सगळ्या घडामोडी घडत होत होत्या आता अचानक राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.