ठाणे : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेनेच्या वतीने ओवळा–माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १ लाख वह्यांच्या वाटपाला आज सुरुवात करण्यात आली.
गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत व्हावी, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळेल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी आज ठाणे पश्चिम भागातील विविध शिवसेना शाखांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये
- शिवसेना शाखा क्र. १०, लोकमान्य नगर पाडा नं. ४, ठाणे (प.)
- शिवसेना मध्यवर्ती शाखा, पाडा नं. २, लोकमान्य नगर, ठाणे (प.)
- शिवसेना शाखा, वर्तक नगर, ठाणे (प.)
- शिवसेना शाखा, भिम नगर, ठाणे (प.)
- शिवसेना शाखा, शिवाईनगर, ठाणे (प.)
- शिवसेना शाखा, कोंकणी पाडा, ठाणे (प.)
- शिवसेना शाखा, म्हाडा स्वामी विवेकानंद नगर, वसंत विहार, ठाणे (प.)
या उपक्रमाला स्थानिक शिवसेना पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, समाजोपयोगी उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.