मांजामध्ये अडकलेल्या कबुतराची सुखरूप सुटका
ठाणे, १ फेब्रुवारी २०२६ :
चरई येथील जुना मुंबई–पुणे रोडवरील मालतीबाई हॉस्पिटलजवळ उंच मांजामध्ये एक जिवंत कबूतर अडकले असल्याची माहिती आज सकाळी ८ वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. श्री. हेमंत शहा यांनी घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पथकांच्या संयुक्त प्रयत्नातून उंच मांजामध्ये अडकलेल्या कबुतराची सुखरूप सुटका करण्यात आली. सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.