filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 49;
ठाणे शहरातील कर्करोगाच्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जावे लागते. प्रवासादरम्यान त्यांचे प्रचंड हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन या जागेत कर्करोग रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड ठाणे महापालिकेला ‘टाऊन सेंटर’ या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला होता. या भुखंडावर हे रुग्णालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. रुग्णांना किफायतशीर दरात रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपाठोपाठ राज्य शासनाने मंजुरी दिली होती. यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता.
ठाणे महापालिका, जीतो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत असून तसा त्यांच्यात करारही झाला होता. याच दरम्यान, रुग्णालयाच्या आवारातच त्रिमंदिर उभारणीचा निर्णयही घेण्यात आला होता. अडीच वर्षांपूर्वी एकाच वेळी धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान, दोन्ही प्रकल्पांच्या कामासाठी कालावधी ठरवून देण्यात आलेला नव्हता, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात अडीच वर्षांपूर्वी एकाच वेळी धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भुमीपुजन झाले. ठाणे महापालिका, जीतो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या दोन्ही प्रकल्पांच्या कामाचा वेग मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील कर्करोग रुग्णांसाठी रुग्णालय गरजेचे असतानाही, रुग्णालयाऐवजी मंदिराचे काम आधी पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मंदिराला गती, रुग्णालयाला प्रतीक्षा अशी चर्चा ठाण्यात रंगू लागली आहे.