प्रचार सोडुन किरण नाकती यांची ज्येष्ठ नागरीकाच्या अंत्यविधीसाठी धावाधाव
ठाणे,दि.०६ (प्रतिनिधी)
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांची प्रचाराची लगबग सुरू झाली आहे. अशा धामधुमीत
प्रभाग क्रमांक २१ चे अपक्ष उमेदवार किरण नाकती यांनी माणुसकीचा धर्म जागवला आहे. नौपाडा प्रभागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या निधनाची वार्ता कळताच किरण नाकती यांनी प्रचार सोडून धाव घेतली. तसेच, त्या दिवंगत व्यक्तीच्या अंत्यविधीची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन स्मशानभूमी पर्यतचे कर्तव्य देखील त्यांनी व त्यांच्या “वुई आर फॉर यु” च्या टीमने पार पाडले. नेहमीच गरजुंच्या हाकेला धावणाऱ्या नाकती यांच्या या सामाजिक बांधिलकीला ठाणेकरांनीही सलाम केला आहे.
नौपाडा, ब्राम्हण सोसायटीतील सहकार कॉलनी येथील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ज्येष्ठ नागरिक श्रीयुत शरदचंद्र कुलकर्णी काका वास्तव्य करतात. सोमवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. कुलकर्णी काका हे प्रकृतीने लठ्ठ असल्याने निधनानंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी कसा न्यायचा हा यक्षप्रश्न कुटुंबियांसमोर होता. अन अचानक कुणीतरी “वुई आर फॉर यु” संस्थेच्या किरण नाकती यांना संपर्क साधला. किरण नाकती त्यावेळी आपल्या प्रचारात व्यस्त असतानाही जराही वेळ न दवडता आपले सहकारी दिनेश सकपाळ, यश नवले, पार्थ म्हात्रे, मुन्ना जयस्वाल, विलास महाडेश्वर आणि संजय पवार यांना सोबत घेऊन थेट कुलकर्णी यांचे घर गाठले. तात्काळ शववाहिका उपलब्ध करून नातेवाईकांसह स्वतः जबाबदारी पार पडत स्मशानभुमीपर्यंत त्यांच्या इहलोकीच्या यात्रेत सहभाग दर्शविला. किरण नाकती यांची “वुई आर फॉर यु” ही संस्था गेली दहा वर्षे अशा तऱ्हेने समाजातील गरजु तसेच अडल्या नडलेल्यांच्या मदतीसाठी धाव घेत असते. आजवर या संस्थेने कोविड काळ असो वा दुर्घटना नियमित सामाजिक बांधिलकी जपत ठाण्यातील अनेकांना साह्य केले आहे. त्यामुळे किरण नाकती यांच्या या अजोड समाजकार्याची सर्वत्र वाहवा होत आहे.
चौकट – स्वामीभक्ताची अशीही सेवा
” जे जे जगी, जगती तया…त्यांना माझे म्हणा ! या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीप्रमाणे समाजसेवेत कार्यरत असलेले स्वामीभक्त किरण नाकती नौपाडा प्रभाग क्रमांक २१ – ड मधुन ‘फुगा’ या चिन्हावर अपक्ष निवडणुक लढवत आहेत. त्यांनी केलेली ही मदत, केवळ माणुसकीच्या नात्याने जोडलेल्या समाजाचे आणि जबाबदार नेतृत्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.