ठाणे महानगरपालिकेच्या आढावा बैठकीनंतर परिवहन मंत्री तथा ठाणेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विविध प्रकल्पांची प्रगती, वाहतूक कोंडीचे प्रश्न, नाट्यगृह निर्मितीपासून ते रॅपिडोवरील कारवाईपर्यंत अनेक मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कार्याचे मनापासून अभिनंदन केले.
घोडबंदर-वाघबीळ परिसरात भव्य तिसरे नाट्यगृह 7,350 स्क्वेअर फूट जागेवर घोडबंदर परिसरात भव्य नाट्यगृह उभारले जात आहे.
भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी वेळ निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हे नाट्यगृह घोडबंदर परिसरातील सांस्कृतिक गरजा पूर्ण करणारे तिसरे नाट्यगृह ठरणार आहे.

मेट्रो-4 उद्घाटन डिसेंबरपर्यंत.
सरनाईक यांनी सांगितले की मेट्रो-4 प्रकल्पाचे काम 90% हून अधिक पूर्ण असून:डिसेंबरपर्यंत या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मेट्रो अधिकारी प्रचंड मेहनतीने दिवस-रात्र काम करत आहेत.
घोडबंदर रोडवरील कोंडीसाठी कडक पावले,घोडबंदर रोडवरील वाढत्या कोंडीबाबत सरनाईक म्हणाले:काम पाच ठेकेदारांमध्ये विभागले असल्याने समन्वयाचा अभाव दिसतो.सर्व अधिकारी व ठेकेदारांच्या बैठकीत 15 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक नियंत्रणासाठी RTO च्या 5 स्कॉड टीम्स तैनात केल्या जाणार आहेत.“मी स्वतः या कोंडीत अडकतो, त्यामुळे ठाणेकरांना यातून मुक्ती देणे ही आमची प्राथमिकता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.सेवा रस्ता वादावर स्पष्टीकरण – “DP प्लानमध्ये सर्विस रोडच नव्हता”
आ. संजय केळकर यांनी घोडबंदर सेवा रस्ता प्रकरणात केलेल्या आरोपांवर सरनाईक म्हणाले:महानगरपालिकेच्या DP प्लॅनमध्ये सेवा रस्त्याचा कोणताही उल्लेख नाही.पूर्वीच्या आयुक्तांच्या काळात 60 मीटर रस्ता कमी करून काही प्रमाणात सर्विस रोड तयार करण्यात आला होता.यामुळेच वाहतूक कोंडी वाढली असून आता संपूर्ण 60 मीटरचा रस्ता फाउंटन ते नरिमन पॉइंटपर्यंत एकत्र केला जात आहे.
ठाण्यातील कचरा व्यवस्थापन – गायमुखमध्ये राज्यातील पहिला खतनिर्मिती प्रकल्प ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 96% ओला कचरा गायमुख प्रकल्पात प्रक्रिया करून खत निर्मिती केली जात आहे.
राज्यातील हा पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प आहे.
या शिवाय:सोलार डस्टबिन ही नवीन संकल्पना राबवली जात आहे.या उपक्रमांमुळे कचरा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.
MMR क्षेत्रातील पहिला पिकलबॉल टर्फ – उद्घाटन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते.ठाणे महानगरपालिकेने MMR मधील पहिला पिकलबॉल टर्फ उभारला असून त्याचे उद्घाटन काल मंत्री सरनाईक यांच्या हस्ते पार पडले.
रॅपिडो आणि कॅब कंपन्यांवर कडक कारवाई– परिवहन मंत्री म्हणून रॅपिडो, ओला, उबेरवर घेतलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले:बाईक टॅक्सीची परवानगी दिल्याचा उद्देश नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक सेवा व रोजगार निर्मिती हा होता.मात्र काही कंपन्यांनी परवानगीचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने बाईक रस्त्यावर आणल्या.अशा प्रकरणांमध्ये मृत्यूंची संख्या वाढल्याने कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.उबेरवर 1 तर रॅपिडोवर 5 गुन्हे दाखल झाले आहेत.“चालकांवर नव्हे, मालकांवर कारवाई करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.