https://www.facebook.com/share/v/1ChEhPrZfB
ठाणे : शहरातील बेडेकर विद्यालयातील सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची स्काऊट गाईडची कॅम्प लखनऊ येथे गेली होती. तेथून परतताना त्यांची रेल्वे चुकली. त्यानंतर शिक्षकांनी खासगी ट्रॅव्हलर्सच्या मार्फत ठाणे पर्यंतचा प्रवास करण्याचे ठरविले. त्यानुसार, खासगी बसने ठाण्याकडे परतीचा प्रवास सुरु झाला. परंतू, वाटेतच बस चालकाने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सोडून तेथून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे शहरातील नौपाडा भागात बेडेकर विद्यामंदीर शाळा आहे. प्रचंड जुनी आणि प्रसिद्ध अशी ही शाळा आहे. या शाळेतील इयत्ता सातवी आणि आठवीचे १६ विद्यार्थी दोन शिक्षकांसह २१ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे स्काऊट गाईडच्या कॅम्पसाठी निघाले होते.यावेळी शाळा व्यवस्थापकांकडून जाण्याची तसेच येण्याची असे दोन्ही रेल्वे गाड्यांची नोंदणी करण्यात आली होती.
लखनऊ येथून हे सर्वजण २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघणार होते. त्यानुसार, शिक्षक आणि विद्यार्थी ०६ वाजताच खासगी बसने लखनऊ स्थानक येथे येण्यास निघाले. ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान हे सर्वजण लखनऊ स्थानकात पोहोचले. त्यावेळी त्यांना बस चालकाने सांगितले की, तुम्ही ज्या गाडीने जाणार आहात ती गाडी स्थानक क्रमांक ३ वर येईल. त्यानुसार, शिक्षक आणि विद्यार्थी त्या तीन क्रमांकाच्या फलाटावर जाऊन उभे राहिले. ९.१५ वाजून गेले तरी, गाडी कशी आली नाही अशी चिंता शिक्षण आणि विद्यार्थ्यांना वाटू लागली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता, त्यांना समजले की, ती गाडी दुसऱ्याच फलाटावरुन मुंबईला रवाना झाली. हे समजताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेऊन रेल्वे पोलिसांना तसेच स्टेशन मास्टर ला भेटले. परंतू, त्यांना कोणीही मदत केली नाही.