
ठाणे – मुंब्र्यातील परिचित लोकप्रतिनिधी आणि माजी नगरसेवक सुधीर रामचंद्र भगत यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मतदान केल्यानंतरही त्यांचे नाव यादीत नसल्याचे उघड झाले. निवडणुकीत उतरण्याची त्यांची शक्यता गृहीत धरून जाणीवपूर्वक नाव काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून गफलत झाल्याची कबुली दिली. मात्र, नाव यादीत परत टाकत असतानाही “१ जुलैपूर्वी नाव समाविष्ट करता येणार नाही; त्यामुळे मतदान आणि निवडणूक लढविणे शक्य नाही,” असा निर्णय दिला. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचे मान्य केले आहे.
या प्रकारावरून “वोटचोरी” होत असल्याचा आरोप करत भगत यांनी निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी एफिडेव्हिट देण्याची तयारी दर्शवली आहे